बीड | वार्ताहर
जिल्ह्यात बुधवारी (दि.१०) कोरोनाचे नवे २५ रुग्ण निष्पन्न झाले.तसेच १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.बुधवारी सुदैवाने मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही.कोरोना स्थिती आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी जागरूक राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
बुधवारी बीड जिल्ह्यातील ५८७ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ५६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २५ नवे रुग्ण निष्पन्न झाले.शिवाय १४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. महत्वाचे हे की, बुधवारी पहिल्यांदाच प्रत्येक तालुक्यातील बाधितांची संख्या दोन अंकावरुन एक अंकावर आली. बाधित रुग्णामध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी ७, बीड ६, परळी २, पाटोदा ६ व शिरुर तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment