केज । वार्ताहर
शेतीविषयक जमीनीचे वाद गावात मिटवले पाहिजेत. बांधावरून होणार्या कुरापती ,घरगुती भांडण तंटे गावात सोडवण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष आदी प्रमुखांनी गावात सोडवावेत असे मत व्यक्त केले. युसूफवडगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये बैठकी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी व्यक्त केले.
सोमवार रोजी युसूफवडगाव हद्दीतील जि प सदस्य, प स सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस मित्र आदींची बैठक ठेवण्यात आली होती.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत,युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद झोटे यांची होती.यावेळी बोलताना बांधावरून भांडण पोलीस ठाण्याकडे येऊ नये गावात चोर्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय करावे असे आवाहन करण्यात आले बैठकीस परिसरातील सर्व गावांची प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment