केज । वार्ताहर
तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने कोरोना काळातील भरमसाठ आलेले वीज बिल व पेट्रोल, डिझेल,गॅस इत्यादींचे दर तात्काळ कमी करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वाढीव वीज बीलांमुळे सामान्यजनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे. तसेच नुकतेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर भरमसाठ वाढवलेले आहे यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे,यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत नसता या जनहिताच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदनावर तालुका अध्यक्ष राहुल खोडसे,संदीप शितोळे,अमरजीत धपाटे,विलास गुंठाळ,गजानन अंबाड,अमर नखाते,अभिजित शितोळे,रामराजे गलांडे,अभिषेक भिसे,गजानन गायकवाड, सचिन गुजर,योगेश्वर अंबाड,उमेश गुळभिले, सिध्दार्थ वैरागे आदींच्या स्वाक्षरी आहेत
Leave a comment