धारूर बांधकाम उपविभागचे दुर्लक्ष
आडस । वार्ताहर
येथील आडस- धारुर रस्त्यावरील पाणीच्या टाकी जवळ एक झाडं पुर्णपणे झुकले आहे. मोठ्या वाहनांना ते लागतं असून त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. याला चुकविण्याचा प्रयत्न केला तर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे बांधकाम उपविभाग धारुर चे दुर्लक्ष दिसत असल्याने हे धोकादायक झाडं तोडण्याची मागणी नागरिकांनी केली.
आडस ते धारुर रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ रस्त्याच्या कडेला असलेलं एक झाडं पुर्णपणे झुकले आहे. ते कधी कोसळेल याचा नेम नाही. सध्याही मोठे कंटेनर, माल वाहतूक ट्रक,ऊस वाहतूक करणारे याला अडकत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. आठ दिवसांपूर्वी काचा घेऊन जाणार्या ट्रक चालकाचे या झाडाकडे लक्ष गेले नाही. तो सरळ जाताना झाडाला धडक लागून आतील काचा फुटल्या तर ट्रकचे ही मोठं नुकसान झालं. ऊसाच्या ट्रक ही याला अडकत आहेत. जवळ येईपर्यंत सदरील झाडाचा अंदाज चालकाला येत नसून अचानक याला चुकविण्याच्या नादात समोरा समोर धडक होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या बाजूला असलेलं गवत, झाडेझुडपे काढण्यात आली आहेत मात्र इतके मोठे झाडं रस्त्यावर झुकलेलं बांधकाम विभागाला कसे दिसले नाही? या रस्त्याची संदर्भात धारुर बांधकाम उपविभाग आंधळ्याचे सोंग घेत आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Leave a comment