अंबाजोगाईत रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

बीड । वार्ताहर

राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणेघेणे नाही. गायराण जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावची केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे. असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.
अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेवून मंगळवार (ता.9) फेबु्रवारी रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की,  बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडफोड व विटंबना होऊन 4 महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी  अद्यापपर्यंत शासनाने नविन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायराण धारकांचे सरसकट 7/12 नांवे नोंद करून सातबारा द्या, दलित वस्ती विकास योजना वाढीव व प्रभाविपणे राबवण्यात यावी. लॉकडाऊन काळातील विद्युत वीज बील माफ करण्यात यावे आदी मागण्या या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.यावेळी  राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे,प्रमोद दासुद, दिपक  कांबळे,अशोक साळवे,मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे,  महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे,बन्सी जोगदंड,राणी गायकवाड,कपिल कागदे,मंगेश जोगदंड,मिलिंद तरकसे,राहुल गंडले,किरण खंडागळे,सनी वाघचौरे,प्रकाश तांगडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.