बीड । वार्ताहर

बीड शहराला आज बुधवारी (दि.10) होणारा न.प.च्या माजलगाव बॅक वॉटर योजनेचा पाणी पुरवठा एक दिवस लांबणीवर पडला आहे. माजलगाव बॅक वॉटर मुख्य जलवाहिनीवर आठ ठिकाणी लिकेज झाले आहेत. रॉ-वॉटरवर पाच ठिकाणी आणि फिल्टर वॉटरवर तीन ठिकाणी लिकेजव्दारे पाणी वाया जात आहे.

याचा परिणाम दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे साबेर कन्स्ट्रक्शन, पाटोदा गुत्तेदार न.प.बीडकडून दोन जेसीबी, दोन जनरेटर, दोन इंजिन,दोन वेल्डर आणि दहा कुशल,अकुशल लेबर हे पी.आर.दुधाळ व राहुल टाळके यांच्या अधिपत्याखाली 10 फेबु्रवारी रोजी सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत काम करण्याचा अंदाज आहे. विशेष समस्या असल्यास दुरुस्तीचा वेळ वाढू शकतो असे नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.