परळी । वार्ताहर

परळी महावितरणच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना मंगळवारी (दि.9) दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिक संतप्त झाले असून पुन्हा पुन्हा सांगूनही करंट उतरणार्या पोलची दुरुस्ती केले नसल्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेत दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भागातील नागरिकांनी केली आहे.
गौरी वैजनाथ घोटकर (6) असे त्या मुलीचे नाव आहे. महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीब पुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला पुन्हा पुन्हा कळवले. तरीही या भागातील नागरिक नेहमी या खांबा पासून दूर राहत असत मात्र  सोमवारी अतिशय दुर्दैवी घटना घडली. या भागातील मुलगी गौरी वैजनाथ घोटकर ही खांबाच्या संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेत दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अशी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.