मुल होत नसल्याने क्रुरता; आरोपी पोलीसांच्या ताब्यात

बीड | वार्ताहर

 

 तालुक्यातील औरंगपूर येथे एका पतीने पत्नीचा लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून खून केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने दुसरे मुल होत नसल्याने संतापलेल्या पतीने हे क्रुरकृत्य केल्याचे समोर आले. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

राधा महादेव रेड्डे (32, रा.औरंगपूर, ता.बीड ) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती महादेव आसाराम रेड्डे  (35) असे आरोपीचे नाव असून त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत राधा यांचा भाऊ सुनील राधाकिसन बांगडे (रा.चितेगाव, जि.औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राधा व तिचा पती महादेव हे दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील एका शेतकर्‍याच्या शेतात सालगडी म्हणून मजुरी करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या 8 वर्षीय मुलाचे आजाराने निधन झालेले आहे. दरम्यान  कुटुंब नियोजन झाल्यामुळे आता तुला मुलबाळ होणार नाही. मला मुलगा हवा आहे, असे म्हणत महादेव हा राधाचा सतत मानसिक छळ करत होता. याच रागातून शुक्रवारी सकाळी त्याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात गंभीर मार लागल्याने राधाचा मृत्यू झाला.  याप्रकरणी आरोपी महादेव रेड्डे विरुद्ध शुक्रवारी रात्री बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेतले असून आज त्यास न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.