दर रोज वीस टन ऊसापासून तयार केला जातो गुळ
टाकरवण / शिवनाथ जाधव
माजलगांव तालुक्यातील टाकरवण याठिकानी तीन तरूनाने नौकरीच्या मागे नलागता स्वाता उद्योजग व्होणाचे स्वप्न मनाशी बाळगुन गुर्हाळ ऊभारे व हे गुर्हाळ आजमित्तीला अतिरिक्त ऊसासाठी वर्दान ठरत आहे.
टाकरवण परिसर हा ग्रीन बेल्टचा पटा म्हणुन ओळकला जातो. दक्षिण भागातून उजवा कालवा तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्याने या परिसरात मुबलक पाणी साठी उपलब्ध आहे. त्यातच गतवर्षी पाऊस काळ खुप झाल्याने पाणीसाठ्या खुप मोठी वाढझाल्यामुळे शेतकर्याला तारनारे पिक म्हणुन ऊसाकडे पाहिले जाते. या परिसरात शेतकर्यानी खुप मोठ्या संख्येने ऊस पिकाची लागवड केली. आज घडीला अतिरिक्त ऊस लागवड झाल्याने कारखान्यास ऊस घालण्यास शेतकर्याना नाकी नऊ येत आसल्याने तसेच प्रोग्राम नुसार ऊस तोड चालु आसल्याने आपल्या ऊसाचा नंबर लागली नाही या चिंत्ते आसलेल्या शेतकर्याला गुर्हाळाचा फायदा होताना दिसत आहे.टाकरवण याठिकानच्या तीन तरुणांनी सुरू केले गुर्हाळामुळे अतिरिक्त उसासाठी हे फायदेशीर ठरत आहे. दररोज वीस टन ऊसापासून गुळ निर्मिती केली जात आहे.
अतिरिक्त ऊस लागवड खुप झाल्यामुळे ऊस जाईलका नाही यांची चिंत्ता भेढसावत होती पंरतु गुर्हाळ चालु आसल्याने गुर्हाळाला ऊस दिला व योग भाव ही मिळाला अशी प्रतिक्रिया शेतकरी नामदेव सुपेकर यांनी व्यक्त केली तर गुर्हाळ मालक गणेश लव्हाळे म्हणाले,शेतकर्याच्या ऊसाची रिकव्हरी तपासुन ऊसला कारखान्याच्या तुलनेत योग्य भाव देत आहोत व पाऊस पडे पर्यत गुर्हाळ चालु ठेवण्याचे नियोजन केले आसुन सधा रोज वीसटन ऊस गाळपा पासुन गुळ तयार करीत आहोत. सध्या तयार केलेला गुळहा व्यापाराना ठोक प्रकारे विक्री करतोत त्याच बरोबर माजलगांव, जालना,धारूर सह इतर ठिकाणच्या ठोक बाजार पेठेत याची विक्री करत आहोत परतु गुळाचे भाव पडल्याने गुळाचे भाव वाढ मिळण्याची आशा याचबरेबर प्रशासनाने गुळ उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया हनुमान शेरे यांनी मांडली.
रिकव्हरी तपासून भाव
गुर्हाळाला ऊस देण्याअगोदर ऊसाची रिकव्हरी तपासुन रिकव्हरी नुसार शेतकर्याला भाव ठरवुन दिला जात आसुन ऊस तोड संपल्या नंतर आठ ते दहा दिवसानी एक रक्कमी रक्कम शेतकर्याला दिली जात आहे.
Leave a comment