काकू-नाना आघाडीचे चार नगरसेवक फोडले

 

निवडणूक होईपर्यंत आघाडीत एकतरी नगरसेवक राहिल काय?

 

बीड । वार्ताहर

एकेकाळी लोकनेते  स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा होता. त्यांनी पावरफुल राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये खिळखिळी करून टाकली होती. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला होता. त्यांच्या या राजकारणामुळे ते जादुच्या कांडीचा उल्लेख करायचे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये स्व.गोपीनाथ मुंडेच्या जादुच्या कांडीचा करिश्मा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला होता. त्यास काही अनुभव बीडकरांचा आता नगर पालिकेच्या राजकारणात येवू लागला आहे. बीड नगर पालिका निवडणूकीमध्ये काका पुतण्याच्या संघर्षात दोन काका जेरीस आले होते. काकू नाना आघाडीच्या माध्यमातून संदिप क्षीरसागरांची स्वतःची ताकद निर्माण केली होती. नगर पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली मात्र ही राजकीय ताकद अल्पायुषी ठरते की काय असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. काही दिवसापुर्वीच नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी आघाडीचा एक नगरसेवक फोडला काल पुन्हा चार नगरसेवक नगराध्यक्षांच्या तंबूत दाखल झाले आहेत. त्यापुर्वी दोन वर्षापुर्वी एमआयएमचे आघाडी सोबत गेलेले नगरसेवकही नगराध्यक्ष डॉ क्षीरसागरांनी आपल्या तंबूत आणले होते. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कडील जादूची कांडी आता नगराध्यक्ष भुषण साहेबांकडे आली की काय अशी चर्चा बीडमध्ये होवू लागली आहे. नगर पालिका निवडणुकीला अजून जवळपास वर्षे बाकी आहे. तो पर्यंत आघाडी एखादा नगरसेवक राहतो की नाही अशी ही चर्चा एैकण्यास मिळत आहे. 

विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्यानंतरही बीड शहराचा आणि मतदारसंघाचा विकास केवळ बोलण्या पुरताच राहिला. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी आ.संदीप क्षीरसागर यांना आमदार केले. त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काही दिवसापूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी परत चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे आमदाराच्या आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.

एक वर्ष ही झाले नाही अशा स्थितीत मुख्य शिलेदारांना सापत्न वागणूक मिळू लागल्यामुळे आघाडीच्या चार नगरसेवकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करून आघाडीला मोठा सुरुंग लावला आहे. काही दिवसापूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर शुक्रवार दि.29 रोजी नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी प्रा.जगदीश काळे, दिलीप गोरे, दिनकर कदम, विलास बडगे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, गणपत डोईफोडे, सादेकजमा, दादासाहेब मुंडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदाराला लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी याच शिलेदारांनी दिली. परंतु पदावर गेल्यानंतर चारही नगरसेवकांना सापत्न वागणूक मिळू लागली. सन्मानाची वागणूक व कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेतृत्व म्हणून जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. हा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत उभी फूट पडली आहे. अर्धी आघाडी फुटली असून आघाडीच्या 20 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे तर आणखीही काही जण नाराज आहेत.

यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, आघाडीचा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदाराने आपल्या आघाडीत अर्धे तरी नगरसेवक आपल्या बाजूने आहेत का? हे दाखवून द्यावे. बीडकरांची फसवणूक करून विकासाच्या नावाने केवळ थापा मारल्या. एक वर्ष झाले तरी एकही नारळ फुटला नाही. आम्ही जवळचा - लांबचा न पाहता विरोधी नगरसेवकांच्या वार्डात सुद्धा कामे करून दाखवले आहेत. केवळ विकास कामांच्या मुद्द्यावरच आज या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारांनी देखील सावध भूमिका घेऊन विकास कामे करणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे असे ते म्हणाले. यावेळी चारही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 

काकाला नगराध्यक्ष करण्यासाठीच आमदारांची चाल

 

 

एमआयएमचे गटनेते अमर शेख यांचा आरोप

बीड विधानसभा मतदारसंघात अनेक दिवसा पासून फोडा फोडीचे राजकारण होत असून फक्त क्षीरसागर यांचेच कार्यकर्ते फुटतात आणि दुसरी कडे न जाता पुतण्या कढून चुलत्याकडे चुलत्याकडून पुतण्याकडे हि खेडी क्षीरसागर यांचीच अशी टीका एमआयएमचे गटनेते अमर शेख यांनी केली 

पुढे बोलताना नगरसेवक अमर शेख यांनी म्हटले की गेल्या अनेक दिवसापासून काही नगरसेवक भूषण क्षीरसागर कडून संदीप क्षीरसागरकडे जातात. कार्यकर्त्यानो यांच्याच दारात राहण्यापेक्षा तिसरा पक्ष निवडा व स्वतःची एक ओळख निर्माण करावी. जेणेकरून यांच्या विरोधात नवीन पर्याय बीड शहरातील लोकांना निवडता येईल असे न करता एकाच घरातील खोल्या बदलण्याचे पद्धत बंद करावी हि खेळी दुस्याची कोणाची नसून डबल चुलत्यालाच नगराध्यक्ष करण्यासाठी आ संदीप क्षीरसागर यांचीच आहे असे एमआयएमचे नगरसेवक अमर शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

मलाही आमदारकीची ऑफर होती

राजकारणात काम करत असताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते. घरात मोठ्यांचा सन्मान ठेवणे ही संस्कृती आहे. पदासाठी रक्ताची नाती तोडणार्‍यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का? असा सवाल करत गेल्या 35 वर्षापासून मी नगराध्यक्ष आहे. मलाही आमदारकीसाठी आडून बसता आले असते. पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणार्‍या मोठ्यांचा मान राखायला हवा. स्वकर्तुत्वाने राजकारणात यश मिळवावे लागते. ज्यांच्या बोटाला धरून आपण मोठे होतो. त्यांच्याशी बेईमानी करून जनाधार मिळत नसतो. अण्णा सारखे शांत, संयमी आणि कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही. जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली. अशी भावना डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केली.ज्यांनी आज प्रवेश केला आहे. त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ, आपण तरुण नगरसेवक आहात. भविष्यातील चांगले नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा आणि मतदारसंघाचा विकास करूया आणि पुन्हा एकदा झालेल्या चुका सुधारून मतदारांचा विश्वास संपादन करूया असे आवाहन त्यांनी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.