विभागीय पुरस्कार मिळालेल्या ग्रा.पं.पदाधिकार्यांचाही सन्मान
उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी,पोलीस, नागरिकांचा सत्कार
बीड । वार्ताहर
प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ नंतर बीड पोलिस मुख्यालय मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा पोलीस अधिक्षक आर. राजा स्वामी यांना राष्ट्रपती यांचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. याप्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.
तसेच बीड जिल्हा पोलीस दलाचे तीन अंमलदार पोलीस हवालदार-247 मोहन आश्रुबा क्षीरसागर नेमणूक स्था. गुन्हे शाखा बीड, पो.ना.275 गणेश भिमराव दुधाळ नेमणुक महामार्ग सुरक्षा व पो.ना. नरेंद्र विश्वनाथ बांगर नेमणुक स्था. गुन्हे बीड यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचयतींचा सत्कार पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आहे. बीड जिल्ह्यातील विभागातून प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचयात कोळवाडी ता.बीड, (ग्रामसेवक सखाराम विठोबा काशिद सरपंच सौ. सुदामती महादेव ढेरे) ग्रामपंचयात मस्साजोग ता केज (ग्रामसेवक धनंजय आबाराव खामकर सरपंच सौ. अश्विनी संतोष देशमुख) व ग्रामपंचयात कुसंळंब ता. पाटोदा (ग्रामसेवक दिपक कुंडलिक वाघमारे सरपंच सौ रोहिणी सतिश पवार) या
ग्रामपंचयतींना विभागुन देण्यात आला. विभागातून व्दितीय पुरस्कार ग्रामपंचयात नाळवंडी ता.बीड, (ग्रामसेवक भाउसाहेब नवनाथ मिसाळ सरपंच राधाकिसन लक्ष्मण म्हेत्रे ) ग्रामपंचयात सांडरवण ता. बीड (ग्रामसेवक सत्यवान विक्रम काशिद सरपंच पांडुरंग नारायण धारकर ) व ग्रामपंचयात टोकवाडी ता.परळी या ग्रामपंचयातींना विभागुन देण्यात आला तर विभागातून तृतीय पुरस्कार ग्रामपंचयात गोमळवाडा ता. शिरूर कासार (ग्रामसेवक प्रविण सूर्यभान मिसाळ सरपंच सुदाम श्रीरंग काकडे ) व ग्रामपंचयात सनगाव ता. अंबाजोगाई (ग्रामसेवक नारायण विठठलराव पवार सरपंच सौ. सुलभा संजय मुंडे) या ग्रामपंचयातीना विभागुन देण्यात आला.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार नागरिक तसेच गुणवत्ता सिद्ध करणार्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Leave a comment