सहभाग असावा- खा.डॉ.प्रितमताई मुंडे

बीड । वार्ताहर

अनेक दशके रखडलेला अयोध्या राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला. सांस्कृतिक व श्रद्धेचा हा लढा पाच दशकांपासून चालू होता. अखेर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिर शिलान्यास 5 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. आगामी तीन वर्षात भव्य राम मंदिर निर्माण कार्य पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. राम मंदिराच्या उभारणीत पंथ,प्रांत, भाषा,धर्म,पक्ष विसरून रामभक्त एकदिलाने या मंदिर निर्माण कार्यात सहभागी होत आहेत. देशातील प्रत्येक राम भक्ताची इच्छा आहे कि राम मंदिराच्या निर्माणामध्ये किमान आपली एक वीट असली पाहिजे. हि रामभक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी निधी संकलन अभियान देशात सुरु आहे.या अभियानाला प्रतिसाद देऊन अयोध्या स्वप्नपूर्तीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.


 अयोध्या श्रीप्रभू रामचंद्र मंदिर निर्माण निधी संकलन अभियान अंतर्गत आज भाजपा प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक हॉटेल यशराज इन जालना रोड,बीड येथे संपन्न झाली. या बैठकीस मा.आ.केशवदादा आंधळे, आदिनाथराव नवले पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रमुख डॉ.सुभाष जोशी, जिल्हा संघप्रमुख सोनवणे,निधी संकलन अभियान प्रमुख अनंत बार्शीकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी मंडल अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खा.मुंडे म्हणाल्या कि, अयोध्या राम मंदिराला मोठा संघर्ष आणि इतिहास आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे देशवासीयांचे आदर्श व्यक्तिमत्व आहे. प्रभू रामचंद्रांचे त्यांच्या जन्मभूमीत मंदिर उभारणीचे काम आज प्रत्यक्षात सुरु झाले आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक राम भक्तांपर्यंत पोहचावे. राम मंदिर निर्माण कार्यासाठी देणगी जमा करावी. या ऐतिहासिक राम मंदिर निर्माण कार्यासाठी बीड जिल्ह्यातून भरघोस निधी संकलन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.