गुन्हे शाखेच्या पथकाची आष्टीत कारवाई

आष्टी । वार्ताहर

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणार्‍या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.24) अटक केली. ही कारवाई आष्टी येथील गणपती चौकात करण्यात आली.
रामचंद्र शिवाजी पवार (30,रा.वटणवाडी ता.आष्टी) असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणार्‍यांविरुध्द कारवाईचे आदेश दिले होते. आष्टीत रामचंद्र पवार हा विनापरवाना पिस्तूलसह असल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय गोसावी,पो.ना. अशोक दुबाले, राहुल शिंदे, प्रसाद कदम यांच्या पथकाने रविवारी आष्टी-अहमदनगर रोडवरील गणपती चौकातून रामचंद्र पवार यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले. या पिस्टलमध्ये मॅगझीन आढळले नाही. या प्रकरणी त्याच्याविरुध्द आष्टी ठाण्यात गुन्हा नोंद करुन त्यास तेथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.