आष्टी । वार्ताहर
जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यातील खिळद येथे सोमवारी पहाटे 52 कोंबड्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील खिळद येथील शेतकरी तुषार नानभाऊ गर्जे यांनी घरासमोर मोकळ्या जागेत कुक्कुटपालन हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू केलेला आहे. सध्या त्यांच्या कडे किमान पाचशे गावरान कोंबड्या आहेत त्यापैकी सोमवारी पहाटेच्या सुमारास 52 कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्या. यानंतर त्यांनी तात्काळ आष्टीच्या पशुसंवर्धन विभागात माहिती दिली असता डॉक्टर ए.एन.तूराळे, डॉक्टर विष्णू साबळे यांच्या पथकाने तात्काळ खिळद येथे भेट देऊन मृत कोंबड्याची पाहणी केली तसेच मृत कोंबड्याची पंचासमक्ष विल्हेवाट लावून तपासणीसाठी काही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत यावेळी सहाय्यक युवराज परदेशी, डॉ.एन डी चौधरी, डॉ.एल.एम.गर्जे आदी उपस्थित होते.
Leave a comment