नांदुर घाट । वार्ताहर
केज तालुक्यातील नांदूर घाट येथील राम चौक येथे शुक्रवार रोजी दिव्यांग लोकांच्या विविध प्रश्नांसाठी नांदुरी घाट येथे प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन पार पडले या उद्घाटन प्रसंगी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शालिनीताई उजगरे .संपर्कप्रमुख विलास रुद्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदूर घाट येथील नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष विशाल नाळपे. उपाध्यक्ष दत्ता आंधळकर. यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार अमोल जाधव. मुकुंद जाधव. पत्रकार श्रीकांत राजे जाधव, कराळे महाराज, वैभव नाळपे. लहू कसबे. अशोक जुगदर. नानासाहेब पाटोळे. दत्तात्रय वरवडे व गावातील दिव्यांग महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या कित्येक वर्षापासून नांदुर घाट ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी दिव्यांग लोकांसाठी कुठल्याही प्रकारे निधी उपलब्ध केला नाही किंवा योजनादेखील दिलेल्या नाहीत असे मत जिल्हाध्यक्षा शालिनीताई उजगरे यांनी बोलून दाखवल्या येणार्या काळामध्ये दिव्यांग लोकांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आम्ही सतत तत्पर राहू आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून पीडित वंचित दिव्यांग बांधव आहेत. त्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ असा आशावाद देखील उजगरे मॅडम यांनी बोलताना करून दिला.
Leave a comment