आष्टी । वार्ताहर

 आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या कडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  संपत परमेश्वर कर्डीले यांची बिनविरोध निवड झाली आहे.कडा ग्रामपंचायत वर आ.सुरेश धस यांचे गेल्या तीस वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असून सरपंचासह सतरापैकी बारा सदस्य त्यांच्या गटाचे विजयी झालेले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला पदाची संधी मिळावी या उद्देशाने आमदार सुरेश धस यांनी ठराविक कालावधी दिला आहे.गेल्या महिन्यात कडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश भंडारी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली त्यात त्यांची निवड करण्यात आली

 

तीन वर्षांपूर्वी लोकमतातुन सरपंचपदी सौ. दिपमाला अनिल ढोबळे यांची निवड झाली होती. पीठासीन अधिकारी सरपंच दिपमाला ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी आ.धस गटाचे संपत कर्डीले यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांचा  एकमेव अर्ज आल्याने  बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी दिपमाला ढोबळे  यांनी जाहीर केले. यावेळी सहायक  म्हणुन तलाठी नवनाथ औंदकर, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे यांनी सहकार्य केले.नुतन उपसरपंच संपत कर्डीले यांचे आ. सुरेश धस, माजी जि. प. सदस्य देविदास धस, युवा नेते जयदत्त धस, सभापती रमजान तांबोळी, सरपंच दिपमाला ढोबळे, माजी सभापती संजय ढोबळे, माजी सरपंच रामशेठ मधुरकर, माजी उपसरपंच युवराज पाटील, आष्टी तालुका दुध संघाचे संचालक नागेश कर्डीले, माजी सरपंच संपत सांगळे, सुभाष ढोबळे,बाळासाहेब देशमुख, सचिन शिंदे, सुनिल देशमुख, माजी उपसरपंच संभाजी कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, हेमंतकुमार पोखरणा, डॉ. महेंद्र पटवा,बाळासाहेब कर्डीले, राम मधुरकर,अनिल शिंदे, रमेश देशमुख,श्रीपाल धुमाळ,  संजय मेहेर इतरांनी  अभिनंदन केले आहे. उपसरपंच निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने  सरपंच सौ दिपमाला ढोबळे व सर्व सदस्यांनी  सत्कार करत शुभेच्छा दिल्यास.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.