बीड । वार्ताहर
वयोवृध्द महिलेच्या घरात शिरुन शेजारी राहणार्याने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील कर्झणी येथे 9 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी बुधवारी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पीडित 60 वर्षीय महिलेचा मुलगा ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. ती एकटीच कर्झणी येथे राहते. 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा हनुमान मल्हारी सपकाळ (55) हा त्यांच्या घरात घुसला. त्याने पीडितेचा हात पकडून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्यावर त्याने धूम ठोकली. दरम्यान, पीडितेने मुलाला गावी बोलावून घेत बुधवारी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. हवालदार अशोक सोनवणे तपास करत आहेत.
Leave a comment