शेतकर्यांनी रस्ता अडविल्याने काम रखडले
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील वाहीरा ते पिंपळगावदाणी या दोन गावांना जोडल्या जाणार्या 100 मीटर अंतराच्या रस्त्याची रस्त्याची खुप प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधुन त्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र सर्वे नंबर 96,97,98 मधील शेतकर्यांनी या रस्त्याचे काम अडवून धरले आहे.यामुळे वाहिरा, घोंगडेवाडी,व निमगाव बोडखा,या ग्रामस्थांना कड्या सारख्या बाजार पेठेच्या गावाला व तालुक्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा खुप त्रास होत आहे.
याबाबत वाहीरा ग्रामपंचायतीने प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही प्रशासन आमची दखल घेत नाही.नुसते उडवाउडवीची उत्तरे देत आहे.अशी माहीत वाहीरा ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतचे उपसरपंच वाळके यांनी दिली आहे.तसेचप्रशासनाने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी अन्यथा आंम्ही उपोषणाला बसणार प्रशासनाला वाहीरा ग्रामपंचायतीने निवेदनही तहसिलदार यांना दिले आहे.
Leave a comment