तलाठी, मंडळाधिकार्‍यासह चौघांवर गुन्हा

चकलांबा । वार्ताहर

जमिन मालक असलेल्या महिलेला कसलीही नोटीस न देता तिच्या परस्पर बनावट फेरफार नोंद घेऊन दहा गुंठे जमीन हडप केल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील माटेगाव येथे उघडकीस आला. या प्रकरणी तलाठी, मंडळाधिकार्‍यासह अन्य दोघांवर चकलांबा ठाण्यात मंगळवारी (दि.19) गुन्हा नोंद झाला. यामुळे तलाठी,मंडळाधिकारी आपल्या पदाचा कसा दुरपयोग करु शकतात याची प्रचिती आली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, सिंधुबाई कांता कर्डिले (रा.माटेगाव) यांची माटेगाव शिवारात दहा गुंठे जमीन आहे.तेथे विहीर खोदलेली आहे.सिंधुबाई यांच्या तक्रारीनुसार, मीना भाऊसाहेब कर्डिले व भाऊसाहेब एकनाथ कर्डिले यांनी तलाठी प्रशांत महावीर ढोले, मंडळाधिकारी सुनील साहेबराव तांबारे यांच्याशी संगनमत करुन बनावट फेरफार नोंद घेऊन नोटीस न देता सिंधुबाई यांच्या नावावरील जमीन 8 जानेवारी 2020 रोजी मीना व भाऊसाहेब यांच्या नावे केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिंधुबाई कर्डिले यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन मंगळवारी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निरीक्षक विजय देशमुख तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.