बीड । वार्ताहर
जिल्ह्यात सोमवारी (दि.18) कोरोनाचे 31 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 35 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुदैवाने मागील दोन दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद आरोग्यविभागाकडे झाली नाही.आता जिल्ह्यात 268 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी जिल्ह्यात 381 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील 350 अहवाल निगेटिव्ह आले तर 31 पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई 11, बीड 10, केज 1, माजलगाव 5, परळी 3 व वडवणी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. आता बीड जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 17 हजार 369 एवढी झाली आहे. पैकी 16 हजार 552 कोरोनामुक्त झाले असून 549 जणांचा मृत्यू झाला आहे. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment