आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी आज (दि.15) मतदान प्रक्रिया पार पडली असून यासाठी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतमध्ये सुमारे 86.65% मतदार झाले असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे यांनी दिली आहे.
आष्टी तालुक्यातील वटणवाडी, सुंबेवाडी, सोलापुरवाडी, पिंपळा, खुंटेफळ पुंडी, कर्हेवाडी, कर्हेवडगाव, हातोला-खाकाळवाडी, डोईठाण, धनगरवाडी (डोईठाण), धनगरवाडी (पिंपळा) या 11 ग्रामपंचायतींचे मतदान आज शांततेत पार पडले सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती.अकरा ग्रामपंचायतचे एकूण 33 मतदान केंद्रांवर 148 कर्मचारी व अधिकारी तसेच 33 पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आले होते. या 11 ग्रामपंचायतींच्या 75 जागांसाठी 143 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. या मध्ये 12 हजार 328 मतदारांनपैकी 10 हजार 682 एवढ्या मतदारांनी हक्क बजावला असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी दिली.गावनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे वटणवाडी - 743 पैकी 705, सुंबेवाडी - 423 पैकी 403, सोलापुरवाडी-776 पैकी 691,पिंपळा- 2525 पैकी 2126,खुंटेफळ पुंडी- 971 पैकी 839, कर्हेवाडी- 1139 पैकी 1020, कर्हेवडगाव-1183 पैकी 1029, हातोला-खाकाळवाडी-2339 पैकी 1876, डोईठाण- 1192 पैकी 1038, धनगरवाडी (डोईठाण)- 534 पैकी 481, धनगरवाडी (पिंपळा)-503 पैकी 474 असे एकूण 11 ग्रामपंचयतसाठी 86.65%मतदान झाले असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे यांनी दिली. रोड लगत आसलेल्या वटनवाडी ग्रामपंचायत आज रोजी झालेल्या निवडनुकीत यंदा चांगलीच चुरस दीसुन आली राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे व जि.प सदस्य सतिश शिंदे यांच्या विरोधात विधान परीषद आमदार सुरेश धस यांचे माजी सरपंच ! भगवान शिनगिरे यांचे पाँनल होते सात जागेसाठी निवडनुक मतदान प्रक्रीया पार पडली निवडणूक जरी चुरशी झाली आसलीतरी माझी सरपंच भगवान शिनगिरे यांच्या समाज कार्याच्या कार्यवर चार जागा जिकुण विजयी होतील आसा एकदरीत मतदारांचा कौल आहे.
Leave a comment