कावळ्याचा तडफडून मृत्यू

पिंपळवंडी । वार्ताहर

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील अहमदनगर बीड रस्त्यावर  हॉटेल लोकसेवाच्या परिसरातील झाडाखाली एका कावळ्याचा शुक्रवारी (दि.15) दुपारी चारच्या दरम्यान तडफडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील मुगगाव येथे कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपळवंडी येथे कावळ्याचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.पिंपळवंडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव यांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले, यावेळी वन विभाग कर्मचारी शहादेव पवार ग्रामपंचायत कर्मचारी शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.मृत कावळ्याला खड्डयात ब्लिचिंग पावडर टाकून पुरण्यात आले. या प्रकारामुळे डॉ.जाधव यांनी त्या परिसरातील अनेक जिवंत कोंबड्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.