गेवराई । वार्ताहर

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहरानजकीच्या जमादारणीच्या पुलाजवळ दुचाकीला भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. शुक्रवारी (दि.15) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलीसांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर अशोक सांगुळे (दि.24) असे मयताचे नाव आहे.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या भरधाव ट्रकने क्र.(एम.एच.20 डी.ई 6995) उभ्या दुचाकीला क्र.(एम.एच.23 ए.जी.3315) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील ज्ञानेश्वर सांगुळे या तरुणाचा डोक्याला व हातपायास गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. सांगुळे हा गेवराईत मिस्त्री काम करायचा. शुक्रवारी सकाळी तो दुचाकीवरुन मजुरांना आणण्यासाठी जमादारणीच्या पुलाकडे जात होता. यावेळी समोरुन येणार्‍या मालवाहु ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याठिकाणी महामार्गावर रस्ता दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या बांधकाम विभागाला अजून किती जणांचे अपघात झाल्यावर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जाग येईल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर  गेवराई पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.