बीड | वार्ताहर
जिल्ह्यात आज शुक्रवारी कोरोनाचे 35 नवे रुग्ण निष्पन्न झाले. जिल्ह्यातील 412 संशयित रुग्णांची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 377 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 35 रुग्ण बाधित निष्पन्न झाले.
बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 17 तर अंबाजोगाई 10, आष्टी 1, धारुर 1 तसेच केज, माजलगाव व परळी तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आता जिल्ह्यातील एकुण रुग्णांची संख्या 17 हजार 264 इतकी झाली असुन यातील 16 हजार 403 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 545 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment