बीड । वार्ताहर
मागील तीन दिवसापासून थांबलेले कोरोनाचे मृत्यसत्र रविवारी पुन्हा सुरु झाले. दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली. तसेच सोमवारी (दि.11) कोरोनाचे 35 नवे रुग्ण निष्पन्न झाले.
आता एकूण बाधितांची संख्या 17 हजार 144 एवढी झाली आहे. पैकी 16 हजार 267 कोरोनामुक्त झाले असून 542 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात नागझरी (अंबाजोगाई) येथील 63 वर्षीय पुरुष व ढोरवाडी (ता.वडवणी) येथील 92 वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्यात 421 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी 386 निगेटिव्ह आले तर 35 जणांचे अहवाल कोरोना बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये सर्वाधिक 12 रुग्ण आष्टी तालुक्यातील असून यापाठोपाठ अंबाजोगाई 6,बीड 9, गेवराई 2 , केज 2 , आणि माजलगाव ,परळी ,शिरूर व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment