गेवराई । वार्ताहर
शेताकडे निघालेल्या रुस्तुम मते (55) या शेतकर्यास वाळूची अवैध वाहतूक करणार्या टिप्परने चिरडल्याचे घटना सोमवारी सकाळी राक्षसभुवन गेवराई रोडवरील गंगावाडीजवळ घडली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल चार तासाहून अधिक काळ ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोपींना तात्कळ अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर याप्रकरणातील एक हायवा व आरोपीला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक युवराज टाकसाळ यांनी माहिती दिली.
रुस्तुम मते हे आपल्या शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. राक्षसभुवनहुन वाळुने भरलेल्या हायवाने मते यांना चिरडले. यात मते याच्या शरीराचा अक्षरशा चेंदामेदा झाला होता.घटनेनंतर नातेवाईक व गावातील नागरीकांनी तलाठी, मंडळअधिकारी यांना निलंबित करावेत या मागणीसाठी तब्बल चार तास मृतदेहासह रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर प्रशासनातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून वाळू तस्करी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांनी ही आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.शनिवारी (दि.9) टिप्परसह एकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.दरम्यान आरोपीचे नाव पोलिसांनी घोषित केले नसून याप्रकरणात आणखी कोणाकोणाला अटक होती हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Leave a comment