पाटोदा  । वार्ताहर

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे धबधब्याच्या बाजूला शुक्रवारी (दि.8) दुपारी झाडाला लटकलेला अज्ञात मृतदेह सापडला. दरम्यान हा खून की आत्महत्या याची चर्चा सौताडा परिसरात चालू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटोदा पोलीसांनी घटनास्थळी धाव गेतली. 
सावताडा रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा श्री क्षेत्र  रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सौताडा वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना मंदिराच्या उजव्या बाजूला छोट्या धबधब्याजवळ एका झाडाला अज्ञात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळाला. हा मृतदेह अर्धा झाडाला तर अर्धा खाली पडलेल्या अवस्थेत  असुन  हा खून की  आत्महत्या अशी चर्चा आहे. अंगावर तीन गुडीचा शर्ट धोतर डोक्याला पंचा असा पेहराव  असुन साधारण 55 ते 60 वय  असू शकते या वेळी वन रक्षक भाऊसाहेब पेचे यांनी पाटोदा पोलीसांनाफोनवरून खबर दिली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.