परस्पर विरोधी तक्रारीवरुंन 20 जणांवर गुुन्हा

गेवराई । वार्ताहर

जागेच्या वादातून तालुक्यातील रसुलाबाद येथे दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांनी हातात तलवार, कत्ती,कोयते, कुर्‍हाड घेवून एकमेकाना मारहाण केल्याने दोन्ही गटातील लोक जखमी झाले. बुधवारी (दि.6) दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटातील 20 जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशीर बशीर शेख यांच्या फिर्यादीवरुन, बुधवारी दुपारी ते त्यांच्या घराजवळ असतांना आरोपींनी ‘ग्रामपंचायतच्या जागेवर बांधकाम का करता’ अशी कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात तलवार मारुन गंभीर जखमी केले. तसेच नशीर शेख यांचा मुलगा आशपाक अरीफ यास धारदार शस्त्राने वार करत दुखापत केली, तर मेहुणा इस्माईल यास एका आरोपीने कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारुन पाय फॅक्चर केला. या मारहाणीत खतीजा शेख, बशीर शेख हे गंभीर जखमी झाले. यावरुन रज्जाक पठाण, रुकसानाबी पठाण, अजीज पठाण, फय्याज पठाण, आबेद पठाण, मदीनाबी पठाण, शमीनाबी पठाण, आलीयाबी पठाण, अहेमद पठाण, साजीद पठाण, आसेफ पठाण व शफीक पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कलम 307 नुसार चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान फय्याज पठाण यांनीही तक्रार दिली. ‘तुम्ही वादग्रस्त जागेवर बांधकाम करु नका’ असे समजावून सांगत असतांना आरोपींनी हातात कोयते व लाकडी दांडे घेवून धावून येत फय्याज पठाण यांच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केेले यात त्यांचे वडील व पत्नीही जखमी झाले. या प्रकरणी नशीर शेख,अश्फाक शेख, आरीफ शेख, इस्माईल शेख, बशीर शेख, मुन्ना शेख, खतीजाबी शेख, जावेद शेख या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.