बीड । वार्ताहर

शहरातील प्रसिद्ध औषधी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व  विश्व हिंदू परिषदमध्ये सक्रिय सहभाग असलेले बीड येथील योगीराज तोडकर (49) यांचे औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना आज गुरुवारी (दि.7) दुपारी निधन झाले.


तोडकर यांच्यावर औरंगाबाद येथे मागील वीस बावीस दिवसापासून उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती,पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात येणार होते. त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच  तोडकर यांची प्राणज्योत मालवली. बीड येथे मेडिकल एजन्सीच्या व्यवसायात आपली वेगळी ओळख  निर्माण करण्यासोबतच सामाजिक उपक्रमात देखील ते नेहमी अग्रेसर असायचे.संघाच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.गत महिन्यातच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते. तोडकर कुटुंबियाच्या दु:खात लोकप्रश्न परिवार सहभागी आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.