स्पर्धेकांनी नाव नोंदणी करावी-रघुनाथ कर्डिले
आष्टी । वार्ताहर
दर्पणकार बाळशास्ञी जाभेंकर यांच्या जयंती निमित्त आष्टी शहरात दि.6 जानेवारी रोजी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले असून,या स्पर्धेत फक्त 50 स्पर्धेकांना सहभागी होता येणार आहे.ज्या स्पर्धेकांना या मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेयचा आहे.त्यांनी नाव नोंदणी करावे असे अहवान आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले यांनी केले आहे.
आष्टी तालुका पञकार संघ,नगर पंचायत आष्टी व धनश्री पतसंस्था यांच्या संयुक्त विद्येमाने आष्टी शहरात दर्पणकार आचार्च बाळशास्ञी जांभेकर यांच्या जंयती निमित्त म्हणजेच 6 जानेवारी दर्पण दिनाचे औचित्य साधून यावर्षी आष्टी शहरात नगर पंचायतच्या वतीने माझी वसुंधरा या कार्यक्रमा अंतर्गत विविध स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून,याच दिवशी सकाळी सात वाजता आष्टी शहरात मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रथम,द्वितीय व ततीय असे अनुक्रमे पाच,तीन,दोन हजार रुपायांची रोख बक्षिस तर सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपञ देण्यात येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत फक्त 50 स्पर्धेकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.या स्पर्धेकांनी आपले नाव जोगेश्वरी न्यूज पेपर एजन्सी गुरव व जगदंबा उद्योग समूह आष्टी याठिकाणी नोंदणी करावी असे अहवानही आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले यांनी केले.तसेच या मॅरेथाॅन स्पर्धेतील विजेता स्पर्धेकांना स्पर्धो संपन्न झाली की,उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Leave a comment