गेवराई । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील 22 ग्रामपंचायत च्या निवडणूकीत गुरुवार दि.31 रोजी झालेल्या निवडणूकीत 5 उमेदवारांचा अर्ज अवैद्य ठरले असून तर 653 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. 4 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
गेवराई तालुक्यातील 137 ग्रामपंचायत पैकी 22 ग्रामपंचायत ची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. गुरुवारी दि. 31 रोजी या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. यामध्ये अनेक उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले होते. मात्र पाचच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर 653 उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले आहे. यात मादळमोही 82 अर्ज, भडंगवाडी 15 अर्ज, मुळूकवाडी 24,जव्हारवाडी 25, वंजारवाडी 26, कुंभारवाडी 26, मानमोडी 25, गढी 45, तळेवाडी 22, मन्यारवाडी 21, पांढरवाडी 34, डोईफोडवाडी 25, चव्हाणवाडी 31, गोविंदवाडी तह तलवाडा 7, तलवाडा 83,गंगावाडी 36 , सुर्डी 16, चोपड्याचीवाडी 26, टाकळगव्हाण तरफ तालखेड 17, बाबूलतारा 16, खेर्डा बु 23, खेर्डावाडी 28 अर्ज वैद्य ठरले आहेत. 4 जानेवारीला या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. गेवराई तहसीलदार कार्यालयात मोठी गर्दी करण्यात आली होती.
Leave a comment