जि.प.सदस्य अशोक लोढा यांचा गंभीर आरोप
अधिकारी-गुत्तेदारांच्या संगणमतातून लोकप्रतिनिधींची दिशाभूल
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्गाचे सा.बां.विभागामार्फत होणार्या रस्त्याची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची होत असुन एक दोन वर्षातच रस्त्याची दुरावस्था होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि गुत्तेदाराचे संगनमतामुळे लोकप्रतिनिधी ना थातुर मातुर उत्तरे देवून उडवा उडवी केली जाते. सचिव, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, गुणवत्ता व दक्षता मंडळ कार्य अभियंता यांना वेळोवेळी तक्रार कयन सुध्दा दखल घेतली जात नाही. उलट तक्रारदारांना दमदाटी करण्याचा प्रकार होतो.
डब्ल्यू बीएमच्या प्रत्येक थराची दबाई होत नाही. दोन्ही थराची एकदाच दबाई केली जाते. डांबराच्या वापर अत्यल्प होत आहे. गावाजवळ असणार्या रस्त्यासाठी वापर करून इतर ठिकाणी अत्यंत कमी डांबर वापरले जाते. साईड पट्टयामध्ये माती काढुन मुरूम भरणे ऐवजी तिथलीच माती भरून दबाई केली जाते.3.70 मिटरच्या रस्त्याची रूंदी 3.00 मिटर भरत आहे. अशा अनेक कारणामुळे रस्त्याची गुणवत्ता टिकत नाही व एक दोन वर्षातच रस्ते खड्डे युक्त होत आहेत. मागील महिन्यातच डीबी कन्स्ट्रक्शनने केलेल्या मन्यारवाडी ते आंबेसावळी - ढेकणमोहा रस्त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केल्यावर त्याची चौकशी होवून कामात विलंब केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
अशाचे प्रकार हिवरसिंग रामा -59, वडझरी-डोमरी-रामा 55, थेरला-पाचंग्री-बोरखेड-लोणी घाट रामा 64, ते बोरखेड-रौळसगाव-खउकी घाट रस्ता प्रजिमा 19 कि.मी 28/00 ते बीड रस्ते /5965 या रस्त्याचे काम जोगदंड यांच्या डीबी कन्स्ट्रक्शन कडून असुन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. बाजु पट्टयाचे काम नियमानुसार दबाई न करता एकदाच दबाई केली आहे. स्पेसिफिकेशन नुसार काम होत नाही, याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून आता जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कार्यवाही कराीव व कामाास विलंब झालेबाबत कार्यवाही करण्याची मागणी जि.प.सदस्य अशोक लोंढा यांनी केली आहे.
Leave a comment