बीड । वार्ताहर
येत्या 1 डिसेंबर रोजी औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या दरम्यान सुरु असलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे बीड,माजलगाव व परळी येथील काही परीक्षा केंद्र मतदानाच्या एक दिवसापुरते लगतच्या शालेय इमारतींमध्ये बदलण्यात आले आहेत. माध्यमीक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी आज रविवारी (दि.29) ही माहिती दिली आहे.
बीड शहरातील भगवान विद्यालय हे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र क.2003 आता भा.वा.सानप प्रा.विद्यालय बीड येथे असणार आहे. चंपावती विद्यालयाचे परीक्षा केंद्र क्र. 2000 चंपावती इंग्लिश स्कुल बीड येथे असेल. बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हे बारावीचे परीक्षा केंद्र क्र. 209 मिल्लिया कन्या शाळा, किल्ला मैदान, बीड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय माजलगाव येथील श्री सिध्देश्वर विद्यालय हे दहावीचे परीक्षा केंद्र क्र.2502 आता सिध्देश्वर महाविद्यालयात असणार आहे. परळी येथील न्यु हायस्कुल हे परीक्षा केंद्र क्र.2146 हे स्वामी विवेकानंद महाविद्यालय परळी येथे तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आले असून शिरुरकासार येथील जिल्हा परिषद मा.शाळेचे दहावीचे परीक्षा केंद्र क्र.2625 हे जि.प.कन्या शाळा शिरुरकासार येथे असणार आहे. या परीक्षा केंद्र बदलाची नोंद संबंधित केंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी केले आहे.
Leave a comment