बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आज रविवारी (दि.29) कोरोनाचे नवे 49 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. रविवारी 1 हजार 47 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 998 अहवाल निगेटिव्ह आले तर 49 कोरोना बाधित निष्पन्न झाले.
बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 10, आष्टी 12, बीड 16, गेवराई 2, केज 2, माजलगाव 1, परळी 4 तर वडवणी तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 15 हजार 577 एवढी झाली आहे. पैकी 14 हजार 532 कोरोनामुक्त झाले असून 491 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारच्या 47 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 7 शिक्षकही बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधित आढळून आलेल्या शिक्षकांचा आकडा 96 इतका झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 9 हजार 39 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 547 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment