नुतन सीएस गित्तेंनी पदभार स्विकारला
बीड । वार्ताहर
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. सूर्यकांत गित्ते यांची नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी (दि.27) त्यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान मावळते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी पदभार सोडण्यापूर्वी कोरोना वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधत आढावा घेतला.यानंतर त्यांना कर्मचार्यांकडून निरोप देण्यात आला.
डॉ. अशोक थोरात यांचा बीड जिल्ह्यातील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पाटोदा येथे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सूर्यकांत गित्ते यांची नियुक्ती झाली होती. शुक्रवारी दुपारी डॉ. गित्ते यांनी डॉ. थोरात यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. ए. आर. हुबेकर आदींची उपस्थिती होती. तसेच पदभार दिल्यानंतर सर्व कर्मचार्यांकडून डॉ. थोरात यांना निरोप देण्यात आला.
-----
Leave a comment