56 नवे रुग्ण; 79 जणांना सुटी
बीड । वार्ताहर
कोरोना मृत्यूची संख्या जिल्ह्यात वाढतच आहे. शुक्रवारी (दि.27) जिल्ह्यात आणखी 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली.त्यामुळे एकुण मृत्यूसंख्या 488 झाली. तसेच दिवसभरात 56 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 79 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
जिल्ह्याचा कोरोना मृत्यदर अद्यापही सुमारे सव्वातीन टक्क्यांवर कायम आहे. गुरुवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये दैठणा (ता.अंबाजोगाई) येथील 75 वर्षीय पुरुष व बीड शहरातील पांगरी रोडवरील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 365 जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये 56 नवे रुग्ण आढळून आले तर, 1309 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत 8, आष्टीत 9, बीडमध्ये 16, धारुर1, केजमध्ये 5, माजलगावात 2, परळीत 7, पाटोद्यात 1 आणि वडवणीत 7 नवे रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 15 हजार 470 इतकी झाली असून पैकी 14 हजार 456 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 526 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
84 शिक्षक बाधित
दरम्यान, शुक्रवारी 56 रुग्णांमध्ये 9 शिक्षकही बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधित आढळून आलेल्या शिक्षकांचा आकडा 84 इतका झाला.जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment