माजलगाव | वार्ताहर
माजलगाव न प च्या नूतन नगराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सौ रेश्मा दीपक मेंडके यांनी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी च्या शेख मंजूर यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिवसेना-जनविकास आघाडी नंतर भाजप ने ही एक प्रकारे आ प्रकाश सोळंके च्या समोर घालीन लोटांगण चे दर्शन घडवल्याची चर्चा माजलगाव मध्ये जोर धरू लागली आहे.
23 पैकी 18 नगरसेवकांचे गणित जुळवून आ प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांना राष्ट्रवादी कडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती शिवसेना-एम आय एम-जनविकास आघाडी सह 18 नगरसेवक राष्ट्रवादी च्या तंबूत डेरेदाखल झाले होते.भाजप मधील सुदोपसुंदी मुळे उमेदवार सौ रेश्मा मेंडके या हतबल झाल्या.आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला शेख मंजूर यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Leave a comment