बीड । वार्ताहर
धारुर येथील गिताज्ञान आश्रम आणि श्रीकृष्ण आश्रम तसेच शहरातील तेलगाव रोडवरील एक किराणा दुकान फोडणार्या एका आरोपीस गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुरुवारी चिंचपूर शिवारातून ताब्यात घेतले.साथीदारांसह तीन गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.
रामदास उर्फ कबाल्या इंदर पवार (रा.चिंचपूर शिवार) असे त्याचे नाव आहे. गत महिन्यात धारुरमध्ये या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी धारुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुरुवारी त्यास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने साथीदारांच्या मदतीने धारुरमधील तीनही गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली.गुन्हे शाखेने त्यास पुढील तपासकामी धारुर पोलीसांच्या स्वाधीन केले. इतर आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत,सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, कर्मचारी श्रीमंत उबाळे, हनुमंत खेडकर, कैलास ठोंबरे, प्रसाद कदम, युनूस बागवान चालक गर्जे यांचा कारवाईत सहभाग होता.
Leave a comment