बीड । वार्ताहर
शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात वेगाने होऊ लागला आहे. शुक्रवारी (दि.11) जिल्ह्यात 156 नवे कोरोना बाधित रूग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा एकूण बाधितांचा आकडाही वाढला आहे. शुक्रवारी एकूण 898 स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी 742 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बाधित रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 15, आष्टी 14, बीड 25, धारूर 16, गेवराई 14, केज 10, माजलगांव 16, परळी 24, पाटोदा 4, शिरूर कासार 9 आणि वडवणी तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 109 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 6180 इतकी झाली असून यापैकी 188 रूग्णांचा मृत्यू झाला तर 4316 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात 1676 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment