सांडव्यावरून वाहू लागले पाणी

बीड | वार्ताहर

बीड शहराची तहान भागवणारा तालुक्यातील पाली जवळील बिंदुसरा मध्यम प्रकल्प आज गुरुवारी सकाळी शंभर टक्के भरला असुन प्रकल्पाच्या छोट्या सांडव्यावरून  पाणी वाहू लागले आहे. गत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

प्रकल्प भरल्याने बिंदूसरा नदीच्या पात्रात सध्या वेगाने पाणी वाहत आहे. पाटोदा तालुक्यातील भायाळासह बीड तालुक्यातील पोखरी, बांगरवाडा, बेलखंडी पाटोदा, नागझरी, कदमवाडी या परिसरात पाऊस झाल्याने  बिंदुसरा  प्रकल्पावरील डोकेवाडा साठवण तलाव ओसंडून वाहत असुन या तलावाचे पाणी थेट बिंदूसरा नदीतुन प्रकल्पात येत आहे.त्यामुळे बिंदूसरा प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पाचे पाणी लहान चादरीवरून वाहु लागले आहे. या धरणाची क्षमता ७.९० दलघमी आहे. दुसरीकडे नेकनूर, गवारी, रत्नागिरी, कपीलधार परिसरातील पावसामुळे कर्झणी येथील तलाव भरला असुन खटकाळी बंधाऱ्यातुन वाहणारे पाणी बिंदूसरा नदीपात्रात जावुन मिळत असल्याने सध्या बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

बिंदुसरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील डोंगराळ भागात होतो. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर  पालीजवळ मध्यम प्रकल्प असुन बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला नदीला मिळते.बीड जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा असुन  याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.