बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात रविवारी (दि.6) दिवसभरात तब्बल 198 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 5 हजार 417 झाली असून यापैकी 148 रुग्णांचा मृत्यू तर 3 हजार 908 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता 1361 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रविवारी जिल्ह्यात 949 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासण्यात आले. यातील 198 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 759 संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाईत 17,आष्टी तालुक्यात 20, बीड तालुक्यात 41, धारुरमध्ये 8, गेवराई तालुक्यात 21, केज तालुक्यात 31, माजलगाव-16 परळी 28, पाटोदा 2, शिरुरकासार 10 आणि वडवणी तालुक्यात 4 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात रुग्ण मृत्यू दर आता 2.78 वरुन 2.83 टक्क्यांवर जावून पोहचला आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे.
Leave a comment