बीड । वार्ताहर
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पीटलमधील वॉर्डात जावून कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोव्हिड कक्षात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचार्यांचे कौतुक केले.
‘आता तुमची प्रकृती कशी आहे? सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यवस्थित उपचार मिळतात का? काही अडचणी आहेत का? जेवण सकस मिळते का? असे प्रश्न विचारित रुग्णांना बोलते केले.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सीईओ अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
Leave a comment