बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात रविवारी (दि.16) दिवसभरात आणखी 74 रूग्ण वाढले आहेत. सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या 554 स्वॅबचे रिपोर्ट रात्री 9.15 वा.प्राप्त झाले. त्यातील 479 अहवाल निगेटिव्ह आले असून 1 अहवाल अनिर्णयीत आहे. तर 74 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
बाधीत रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 5, बीड तालुक्या 26, गेवराई 1, केज तालुक्यात 8, माजलगावमध्ये 9, पाटोद्यात 2 तर परळी तालुक्यात 9 रूग्ण आढळले आहेत. याशिवाय शिरूरमध्ये 2 आष्टी 4, धारूर 5 तर वडवणी तालुक्या 3 रूग्णांचा समावेश आहे.
16
Aug
Leave a comment