बीड | वार्ताहर

 

बीड जिल्ह्यात मंगळवारी (दि.11) आणखी 90 कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. यात 40 नवीन तर 50 रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सहवासीत आहेत.

 

 

तालुकानिहाय बाधीत रुग्णांमध्ये बीड 28,अंबाजोगाई 8, धारूर 3, गेवराई 5, केज 10, माजलगाव 5, परळी 20,आष्टी 6, पाटोदा 1 आणि शिरूर कासार तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री एकूण 614 स्वॅब रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यातील  जिल्ह्यात 90 बाधीत, 4 अनिर्णयीत तर 520 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.बीड आणि परळी तालुक्यातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे रिपोर्टवरून दिसून येते. दरम्यान आज बुधवारपासून येत्या 21 ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.