बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात सोमवारी (दि.10) आणखी 230 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले. यात बीड शहरातील अँटिजेंन टेस्टमध्ये आढळलेले 131, ऐनवेळी तपासणीतून 6 व थ्रोट स्वॅबमधून निष्पन्न झालेले 26 अशा 163 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान रुग्णांचा व गावाचा तपशील नंतर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
तालुकानिहाय बाधीत रुग्णांमध्ये बीड 163,अंबाजोगाई 15, धारूर 3, गेवराई 3, केज 13, माजलगाव 7, परळी 15,आष्टी 8 आणि शिरूर कासार तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. सोमवारी रात्री एकूण 3816 स्वॅब रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यातील बीड अँटिजेंन टेस्टसह जिल्ह्यात 230 बाधीत, 11 अनिर्णयीत तर 3575 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.
Leave a comment