मनाई जमावबंदी आदेश  31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू  - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी व शर्तीसह 5 आॅगस्ट पासून परवानगी

बीड । वार्ताहर

राज्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 (1)(3)अन्वये मनाई , जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असून हे आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

तसेच राज्य शासनाचे आदेशानुसार खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.सदर आदेशानुसार  काही बाबींना  पुढील अटी व शर्तीसह दिनांक 05 आॅगस्ट 2020 रोजी पासून जिल्ह्यामध्ये परवानगी देण्यात आली आहे 

1. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सस यांना चित्रपटगृह व्यतिरिक्त सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 7.00 वा पर्यंत कोवीड -19 विषयक सर्व नियमांचे पालन करणेचे अटीवर दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील फूड कोर्ट/ रेस्टॉरंटस यांना फक्त घरपोच सेवा होम डिलेव्हरी साठी परवानगी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी असे नगरपालिका, नगरपंचायती यांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.

2. Covid-19 विषयक बंधने पाळून खुल्या जागा व्यायामासाठी या आधी अमलात असणाऱ्या नियमाप्रमाणेच वापरता येतील.

3. कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी यांना अशैक्षणिक कामासाठी जसे उत्तरपत्रिका तपासणी /निकालपत्र घोषित करणे, संशोधन क्षेत्रातील वैज्ञानिक, ऑनलाइन शिक्षण विषयक कामे इत्यादी करता येतील व यासाठी संस्था उघडता येतील.

4. खुल्या जागा मध्ये सामूहिक क्रीडा व्यतिरिक्त खेळ जसे की जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब यांना दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून covid-19 विषयक सर्व नियमांचे पालन करण्याची अटीवर परवानगी असेल. तसेच जलतरणिका चालू करणेस ही बंदी कायम राहील.

5. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींनी गाडीतील एकूण प्रवाशांच्या संख्येत विषय खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे.
1. दुचाकी:- 1 चालक+1 प्रवासी हेल्मेट व मास्कसह
2.तीनचाकी :- 1चालक + 2 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह
3.चारचाकी:-1 चालक+3 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह 

वरील या बाबींना ५ आॅगस्ट २०२० पासून परवानगी आहे. 

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897.दि.13 मार्च पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ)नुसार नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे मुक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

 यापूर्वी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1)(3) दिनांक 31 जुलै 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या मध्ये वाढ करुन 31आॅगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.