गेवराई शहर 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन 

बीड । वार्ताहर

गेवराई शहरात 44 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. दरम्यान कॉन्टक्ट ट्रेसिंगचा प्रशासनाने आढावा घेतला असता बाधित रुग्णांच्या सर्व सहवासीतांचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही. त्यामुळे सदरील सहवासीतांचा शोध घेवून त्या सर्वांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच गेवराईतील कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी संपूर्ण गेवराई शहरात प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी (दि.29) रात्री एका आदेशाव्दारे गेवराई शहर येत्या 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन केले आहे. शहरात संपूर्ण संचारबंदी घोषीत करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

याबाबतच्या आदेशात जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे, गेवराईत आजपर्यंत 44 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कोरोना बाधित रुग्णांच्या सर्व सहवासीतांचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही. त्यामुळे गेवराई शहरातील इतर भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून गेवराई शहरात 8 दिवसांसाठी (6 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत) संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीत वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे, माध्यमविषयक सेवा 24 तास सुरु राहतील. विशेष परवानगीशिवाय गेवराई शहरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषी व आरोग्य) गेवराई शहरातील सर्व आस्थापना, बँका बंद राहतील. वरील सहा विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्रांव्दारे शहरातंर्गत प्रवास करु शकतील. गेवराई शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पास मिळणार नाही, परंतु मेडिकल इमरजन्सीमधील पाससाठी नागरिकांनी ऑनलाइन अर्ज कोव्हीड19 एम.एच.पोलीस डॉट इन या संकेतस्थळावर भरुन पास प्राप्त करुन घ्यावा.गेवराई शहरात फक्त फिरते दूध विक्रेते यांना परवानगी राहिल. कोणत्यासही दुकानदारामार्फत दूधविक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दूधांची पाकीटांची होम डिलेव्हरी करावी. परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वीप्रमाणे परवानगी राहील परंतु त्यांनी घरोघरी जावूनच विक्री करावी. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी या आदेशान म्हटले आहे. 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.