आणखी रुग्ण वाढले ; एकूण रुग्णसंख्या 536
बीड | वार्ताहर
कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर निर्माण झाले आहे.शनिवारी (दि.25) सकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या 511 झाली असताना रात्री आणखी 25 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या वाढून 536 वर पोहचली आहे. बाधीत रुग्णांमध्ये सर्वाधिक 12 रुग्ण परळी तालुक्यात तर बीड व गेवराईत प्रत्येकी 6 रुग्ण निष्पन्न झाले असून घाटेवाडी(ता.पाटोदा) येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.
बीड शहरातील एक 46 वर्षीय पुरुष डॉक्टर, तसेच पंचशील नगर येथील 25 वर्षीय रुग्णालयीन कर्मचारी महिला, आनंदनगर येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षीय मुलगा, शिवाजीनगर येथील 35 व 58 वर्षीय पुरुष, परळीच्या गणेशपार येथील 62 वर्षीय पुरुष, पदमावती कॉलनी, नरहरी मंदिराजवळ राहणारे 38 व 34 वर्षीय पुरुष, न्यू पदमावती कॉलनी, संभाजीनगर येथील 40 व 35 वर्षीय महिला, पोलीस कॉलनी, आझाद चौक येथील 42 वर्षीय पुरुष, धर्मापुरी (ता.परळी) येथील 48 वर्षीय महिला, 03, व 08 वर्षीय मुलगी, 30, 46 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय मुलगा यांचा कोरोना बाधीत रुग्णांमध्ये समावेश आहे.
याशिवाय गेवराई शहरातील बेदरे गल्लीतील 26 वर्षीय पुरुष, संभाजी चौक येथील 32 वर्षीय पुरुष, लाड गल्लीतील 33 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 45 वर्षीय पुरुष, महेश कॉलनीतील रहिवासी व औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला 33 वर्षीय पुरूष आणि सिंदखेड (ता.गेवराई) येथील 21 वर्षीय पुरुष तसेच पाटोदा तालुक्यातील घाटेवाडी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा बाधीत रुग्णात समावेश आहे.या सर्व रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
,
Leave a comment