गत पंधरा वर्षात प्रथमच जुळून आला योग
माजलगाव । वार्ताहर
माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसाची नोंद झाली असुन पावसाच्या सरासरीच्या तुलनेत केवळ दिड महिन्यात 65 टक्के ऐवढा पाऊस झाला असल्याने धरणाच्या पाणी पातळीतही मोठयाप्रमाणावर वाढ झाली असुन शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता 47.37 टक्के पाणी पातळी झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे .मागील 15 वर्षात जून व जुलै महिन्याच्या पावसात गोदावरी दुथडी भरून वाहण्याचा व धरणात 50 टक्के पाणीसाठा असण्याचा प्रथमच योग् आला आहे.
गेल्यावर्षी माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती.पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने व पावसाळा संपत आला तरी धरणाची पाणी पातळीत जास्त प्रमाणात वाढ न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी जोत्याखालीच राहते की काय ? असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने केवळ चार दिवसात हे धरण टक्केवारीत येऊन पूर्णपणे भरले होते. त्यामुळे शेतकर्यांना कालवा व नदी द्वारे अनेक वेळा पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.
यावर्षी मान्सुनपुर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात 2 टक्के पाणी पातळीत वाढ झाली होती. व त्यानंतर वेळोवेळी दमदार पाऊस पडत राहील्याने मागील दिड महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 65 टक्के पाऊस पडला आहे. माजलगाव तालुक्याची पाऊसाची सरासरी ही 706 मी.मी.असुन यावर्षी 23 जुलै पर्यंत तालुक्यात 427.70 मी.मी.पावसाची नोंद झाली होती.माजलगाव धरणात 2 जुन रोजी427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 204.50 दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर 62.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 19.87 टक्के पाणी होते. 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता या धरणात 429.38 मीटर ऐवढी पाणी पातळी असुन 289.80 दलघमी ऐवढा पाणीसाठा असुन त्यातील उपयुक्त पाणी साठा हा 147.80 दलघमी ऐवढा झाला असुन धरणात 17 हजार 657 क्युसेस ने पाण्याची आवक सुरू होती . आता केवळ धरण भरण्यासाठी 2.42 मीटर ऐवढया पाण्याची आवश्यकता आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
गोदावरी दुथडी भरून;मोरेश्वर मंदिर पाण्यात
माजलगावच्या पूर्व दिशेला वाहणारी गोदावरी नदी मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने दुधडी भरून वाहत असून गंगामसला येथील नवसाला पावणार्या मोरेश्वर गणपती चे मंदिर पाण्याखाली गेले आहे.
Leave a comment