बीड | वार्ताहर

बीड जिल्ह्यात कोरोनामुळे आज सोमवारी (दि.20) आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.18 जुलै रोजी ही महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती.

गेवराई शहरातील फुलेनगर, माळीगल्ली या भागात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत 18 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सोमवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला.दरम्यान कोरोनामुळे आजपर्यंत पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये वृद्ध व्यक्तींचा आणि काही तरुण व्यक्तींचा देखील समावेश आहे .मृत्यू झालेल्या अन्य काही आजार होते असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आता बाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे.रविवारी एकाच दिवशी दोघांचा तर सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात आणखी एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.